तिलापिया

या माशाचे शरीर रुंद,तोंड मोठे असते. पृष्टपर लांब व शेपटीचा पर गोलाकार असतो. प्रजननाच्या वेळी रंग काळसरगाल पांढरे व परांच्या कडा गर्द लाल होतात. मुळचा आफ्रिकेमधिल हा मासा गोड्या निमखाऱ्या किंवा खाऱ्या पाण्यात ही टिकाव धरु शकतो. भारतात सर्वत्र आढळतो पाण्याती तंतुमय वनस्पती व जीवजंतू हे त्याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा वर्षात १/४ किलो पर्यत वाढतो. वयाच्या तिसऱ्या महिन्यात प्रजनन‌क्षम होतो व दर ३ ते ६ आठवड्यांनी पैदास होते. मादी अंडी तोंडात ठेवते व तेथेच पिल्ले बाहेर पडतात. संकटकाळी पिल्ले मादिच्या तोंडात आश्रय घेतात.

 

गँलरी
संपर्क‌
पत्ता : मुकुंद स्टील समोर,
वाडिया पार्क, अ.नगर‌
मो. 9284819898 / 8087996100
ईमेल‌: balemasewale
@gmail.com